दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केलेल्या अटकेच्या निषेधार्थ "आप" चे आंदोलन...

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने काल दिनांक 21 मार्च 2024 रोजी रात्री साडेनऊ वाजता नवव्या समंन नंतर अटक केली. सक्तवसुली संचालनालय यांच्याकडून अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक म्हणजे भारतीय जनता पक्षाची एक राजकीय खेळी असून लोकसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षांच्या वतीने तसेच इंडिया आघाडीच्या वतीने उभ्या केलेल्या आव्हानाला घाबरून ही कारवाई केली गेली आहे.

 


ज्या पक्षातील कार्यकर्त्यांना भाजप विकत घेऊ शकत नाही त्यांच्यावर ईडी आणि सीबीआय सारख्या तपास यंत्रणांचा वापर करून दबाव आणण्याचा प्रकार सर्रास केला जात आहे. महाराष्ट्रातील अनेक राजकीय पुढार्‍यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असताना देखील भाजपने त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला तसेच त्यांना सरकारमध्ये स्थान देऊन मोठ्या जबाबदाऱ्याही देऊ केल्या आहेत, याची उत्तम उदाहरणे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित दादा पवार आणि इंडियन नॅशनल काँग्रेसचे अशोक चव्हाण हे आहेत. याउलट आम आदमी पक्षाचे मनीष सिसोदिया, सतेंद्र जैन यांच्या सारखे निष्ठावंत कार्यकर्ते जे भाजपच्या दबावाला बळी पडले नाही त्यांना कुठल्याही पुराव्या शिवाय जेलमध्ये ठेवले आहे. भारतीय जनता पक्ष हा अटल बिहारी वाजपेयी यांचा पक्ष राहिला नसून तो नरेंद्र मोदींचा भारतातील जनतेला लुटणारा पक्ष झाला आहे.

 एकीकडे भारतीय जनता पक्ष इलेक्ट्रॉल बॉण्डच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये निवडणुकीसाठी स्वीकारत असून त्याकडे ईडी जाणून बुजून दुर्लक्ष करत असतानाच भाजपाच्या राजकीय विरोधकांवर मात्र सर्रास कारवाई करताना दिसत आहे. हे सर्व पाहता भाजपाच्या वतीने तपास यंत्रणांचा हत्यारासारखा वापर केला जात असून या हत्यारांच्या वापरामुळे लोकशाहीला असंख्य जखमा होत आहेत. आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे म्हणाले, आम्ही जनतेला आवाहन करतो आहोत की 2024 च्या लोकसभेला तुम्ही नीट विचार करून मतदान करा तुम्हाला भ्रष्टाचारी सरकारमध्ये हवेत की प्रामाणिक लोक हे ठरवण्याची वेळ आता आलेली आहे .

Post a Comment

Previous Post Next Post