प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : सन 1927 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील गावात अस्पृश्य समाजाला पिण्याचे पाणी साठी सत्याग्रह केले होते. या घटनेला आज दिनांक रोजी 97 वर्ष पूर्ण झाले.
महाड येथील चवदार तळा या ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मोठा जनसमुदाय येथे हजर राहतो.
त्याचे औचित्य साधून मूलनिवासी मुस्लिम मंच, संभाजी ब्रिगेड, भीमआर्मी बहुजन एकता मिशन, रीजनल ख्रिश्चन सोसायटी व महाड येथील मुस्लिम समाज बांधवांचे वतीन रोजा इफ्तरीचा कार्यक्रम योजित केला होता.
रोजा इफ्तार कार्यक्रमच्या निमित्ताने मार्गदर्शन करताना मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज जयंती ते प्रेषित महंमद पैगंबर जयंती पर्यंत एकूण सहा महिने आमचा अभियान सुरू राहणार आहे. महाराष्ट्र 355 तालुका 36 जिल्ह्यात जाऊन सर्व समाज बांधवांमध्ये सलोखा निर्माण करणे व तसेच सर्व धर्मीय लोकांनी एकमेकाचा धर्माचा आदर करणे हे पवित्र काम पुण्यातून सुरू करण्यात आला.
या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान वाटतो की मौलाना हसरत मोहनी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकत्रित रोजा इफ्तार करीत होते.
स्मृती त्या क्षणाची, त्या रोजा इफ्तारची आठवण म्हणून
"अमन का कारवा" अभियान अंतर्गत त्याचाच एक भाग म्हणून आज महाड येथील चवदार तळा या ठिकाणी रोजा इफ्तारीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता असे इनामदार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.
महाराष्ट्र राज्य सरकारचे महाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकचे प्रमुख श्री. जमदाडे साहेब. सामाजिक कार्यकर्ते अनंत कांबळे. पुणे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक काझी, एकता मानव संघटनाचे अध्यक्ष सादिक शेख, उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटी मेहबूब शेख, महाड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलदार पुरकर, हनीफ पुरकर, व त्यांचे सोबत असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी रोजा इफ्तार कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
सदर रोजा इफ्तारीच्या कार्यक्रम मध्ये महाराष्ट्रातून आलेल्या अनेक जिल्ह्यातील माता भगिनींचा मोठा सहभाग होता. विशेषता मुंबईहून आलेल्या एका 90 वर्षी ज्येष्ठ आजीने रोजा इफ्तरिचा आयोजन करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना दुवा दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत असलेल्या मुस्लिम बांधवांच्या अनेक ऐतिहासिक कार्याची माहिती रोजा इफ्तारीचा कार्यक्रम मध्ये पेश केली.