पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ (माई) यांच्या 'सप्तसिंधू' संस्थेस 'शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार' प्रदान


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाजकल्याणाच्या कार्यासाठी  'शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार' हा मानाचा पुरस्कार देण्यात येतो. २०१९ -२० या वर्षीच्या पुरस्कारासाठी  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ (माई) यांच्या 'सप्तसिंधू' महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्थेची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार नुकताच संस्थेच्या अध्यक्षा ममता सिंधुताई सपकाळ यांना मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या दिमाखदार सोहळ्यात सुमंत भांगे, सचिव, सामाजिक न्याय एवं विशेष सहायता विभाग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

शाहू, फुले, आंबेडकर पुरस्काराबद्दल बोलताना ममताताई म्हणाल्या, २०१९ साली माई असताना त्यांच्या स्वाक्षरीनेच हा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला होता. संपूर्ण आयुष्यभर माईंनी पदर पसरून मदत गोळा केली व हजारो अनाथांना सांभाळलं. त्या झोळीपर्यंत पोहोचलेल्या प्रत्येक हाताला हा पुरस्कार समर्पित करत आहोत. तसेच या पुरस्कारासाठी 'सप्तसिंधू' महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्थेची निवड केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे आभार मानत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post