प्रेस मीडिया लाईव्ह :
फिरोज मुल्ला सर
पुणे : पुण्यातील शेख सल्लाउद्दीन दर्ग्याचे बांधकांम हे अनधिकृत असल्याची ट्रस्टकडून कबुली देण्यात आली. छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा ट्रस्टी, पुणे मनपा आणि पुणे पोलिसांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर ट्रस्टींकडून अतिक्रमण झालेले बांधकाम स्वता:हून काढून घेण्याची तयारी दर्शवली. दर्ग्याच्या ट्रस्ट कडून स्वतः दर्ग्याच्या बाजूचा अतिक्रमण हटवण्यात येणार आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतलेल्या बैठकीत ट्रस्टने हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. ट्रस्टीने विनंती केल्यास कायदेशीर असलेल्या कामांच्या नूतनीकरणासाठी पुणे मनपाकडून मदत करण्यात येणार आहे.
पुणे शहरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून कसबा पेठेत दर्ग्याचे अतिक्रमण काढण्याच्या अफवेमुळे तणाव निर्माण झाला होता. या प्रकरण पुणे पोलिसांनी संयमाने हाताळत शहरात शांतता निर्माण केली.