रोटरी क्लब ऑफ पूना नॉर्थ'चा उपक्रम
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे :'रोटरी क्लब ऑफ पूना नॉर्थ' तर्फे पुणे जिल्हयातील ग्रामीण भागात कार्यरत ४०० गरीब महिला शेतकऱ्यांना ४०० गायी देण्यात आल्या.रोटरी क्लब ऑफ पूना नॉर्थचे माजी अध्यक्ष कुमार शिनगारे यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.
खेड,मुळशी,मावळ,हवेली,जुन्नर,पारनेर भागातील गरजू महिला शेतकऱ्यांचा शोध घेऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी हा उपक्रम करण्यात आला.त्यासाठी १ कोटी साठ लाखांचा निधी उभारण्यात आला.निधी उभारणीत रोटरी क्लब ऑफ पूना नॉर्थसह पुणे जिल्ह्यातील ४० रोटरी क्लब,तैवानच्या रोटरी क्लब यांनी पुढाकार घेतला.या महिला शेतकऱ्यांना होल्स्टन,गीर आणि देशी गायी देण्यात आल्या.एका गायीसाठी प्रत्येकी ४० हजार रुपये खर्च करण्यात आले.
२००५ पासून रोटरी क्लब ऑफ पूना नॉर्थ हा उपक्रम करीत असून आतापर्यंत १८०० गायी शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत.त्यातून वीण होत पुढे गायींची संख्या ४० हजार आणि बैलांची संख्या २० हजारांवर पोचली आहे.२०० हुन अधिक दूध संकलन केंद्रांवर गायीचे दूध पोचत आहे.शेतकरी कुटुंबाचे उत्पन्न एका गायीमागे,दरमहा ८ हजाराने वाढले आहे.या उपक्रमासाठी रोटरीच्या ग्लोबल ग्रँटची मदत घेण्यात आली आहे.नेदरलँड,अमेरिका,तैवान येथील रोटरी क्लबची मदत घेण्यात आली.डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह फॉर सेल्फ हेल्प अँड अवेकनिंग(दिशा) या संस्थेचे मार्गदर्शन घेण्यात आले.