तुषार गांधी,सुधींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते होणार गौरव
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : प्रा.डॉ.अप्पासाहेब पुजारी कुटुंबीय(मंगळवेढा) आणि तेजस प्रकाशन(कोल्हापूर) यांच्यावतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पन्नालाल सुराणा,डॉ.वा.ल.मंजुळ,प्रा.निशिकांत ठकार यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
दि.१० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता गांधीभवन(कोथरूड) येथे होणाऱ्या कार्यक्रमात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी,ज्येष्ठ लेखक सुधींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.प्रत्येकी २५ हजार रोख ,मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.प्रा.अप्पासाहेब पुजारी लिखित आणि तेजस प्रकाशन(कोल्हापूर) यांनी प्रकाशित केलेल्या 'अक्षरे अश्रूंची-भाग १' या पुस्तकाचे प्रकाशनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.