प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : दि. २८.०३.२०२४ रोजी भारत इतिहास संशोधन मंडळ , पुणे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती साजरी करण्यात आली .यावेळी ऐतिहासिक व्यक्तींच्या दुर्मिळ चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन जेष्ठ विचारवंत मा. श्री. प्रदीपदादा रावत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री राजेंद्र वागसकर , श्री. गणेश सातपुते , श्री. योगेश खैरे , श्री .साईनाथ बाबर , सौ वनिता वागसकर , सुशीला नेटके , सौ . अस्मिता शिंदे , श्री .आशिष देवधर , श्री . अमोल शिंदे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती . जेष्ठ विचारवंत श्री . पांडुरंग बळकवडे यांनी महाराजांच्या चरित्राची थोडक्यात पण रंजक माहिती दिली . अशा प्रकारे शिवजयंती साजरी करण्यात आली .
संयोजक - सौ . वनिता वागसकर
(शहराध्यक्ष , महिला आघाडी , पुणे )