प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे मेट्रो शहराच्या मध्यभागातून जाताना कसबा हे मेट्रो स्टेशन महत्त्वाचे आहे. हे मेट्रो स्टेशन कसबा पेठेतील मनपा शाळा क्र. ८ येथे आहे. असे असूनही कसब्यातील या मेट्रो स्टेशनला बुधवार पेठ मेट्रो स्टेशन असे का संबोधले जाणार आहे, हे अनाकलनीय आहे.
वास्तविक मूळ पुणे हे ‘कसबा पुणे’ या नावाने ओळखले जायचे. पुण्याचे ग्रामदैवतदेखील कसबा गणपती हेच आहे. या पार्श्वभूमीवर कसब्यातील मेट्रो स्टेशनला बुधवार पेठ मेट्रो स्टेशन म्हणणे पूर्ण चुकीचे आहे. तसेच या परिसराला परिचित नसणारी व्यक्ती मेट्रोतून प्रवास करताना बुधवार पेठ मेट्रो स्टेशन म्हणून उतरेल; मात्र ती बुधवार पेठ असणारच नाही. तसेच कसबा पेठेत जागणाऱ्या प्रवाशाला कसबा पेठ मेट्रो स्टेशन मिळणारच नाही, असा गोंधळही यातून निर्माण होऊ शकतो. यासाठीच कसबा पेठेतील मेट्रो स्टेशनचे नामकरण कसबा पेठ असेच करावे. कसबा पेठेतील नागरिकांनी देखील याबाबत आग्रही राहावे, असे आवाहन मूळ कसबा रहिवासी संघातर्फे सुहास ढोले आणि रमेश भांड यांनी केले आहे.
प्रवीण प्र. वाळिंबे
माध्यम समन्वयक