प्रेस मीडिया लाईव्ह :
श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप, संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड्.) पेठ वडगाव येथे जागतिक महिला दिनानिमित्त व शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय अंतर्गत दिं. ९/०२/२०२४ रोजी महाविद्यालया मध्ये "लाठी काठी प्रशिक्षण कार्यशाळा "आयोजित करण्यात आली होती.
प्रथमत: मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन, दीप प्रज्वलन व रोपास जलार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्र. प्राचार्या सौ.आर.एल. निर्मळे -चौगुले मॅडम यांनी महिला दिनानिमित्त एक अनोखा उपक्रम म्हणजेच महिलांच्या स्वसंरक्षण व सक्षमीकरणासाठी लाठीकाठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती .
कार्यशाळेसाठी प्रशिक्षक म्हणून सौ.संजीवनी चंद्रकांत सुतार शिवकालीन लाठी काठी प्रशिक्षक , शिवकालीन मर्दानी कला अकादमी चौकाक* लाभल्या होत्या. प्रमुख उपस्थितीमध्ये शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालयाच्या सदस्या प्राचार्या डॉ. आरती भोसले मॅडम या उपस्थित होत्या.
कार्यक्रमांमध्ये प्रतिमापूजन, दीपप्रज्वलन, वृक्षास जलार्पण, मान्यवरांचे स्वागत, प्रशिक्षकाचे लाठी काठी प्रशिक्षण, विद्यार्थ्यांच्यासाठी फनी गेम्स, मान्यवरांचे मार्गदर्शन, कार्यशाळेत उपस्थित सर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना प्रशस्तीपत्र वाटप, आभार अशा स्वरूपात कार्यक्रम संपन्न झाला, या कार्यक्रमासाठी शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालया अंतर्गत विविध महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक यांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये छत्रपती शिवाजी शिक्षणशास्त्र महाविद्यालय रूकडी, सावित्रीबाई फुले शिक्षणशास्त्र महाविद्यालय पेठ वडगाव, इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनी व प्राध्यापक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. विविध उपक्रमांच्या माध्यमातून आजचा जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
त्याचप्रमाणे महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील छात्राध्यापिका तेजस्वी खाडे हिने आपले मनोगत व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय सदस्या प्राचार्या डॉ.आरती भोसले मॅडम यांनी महिला दिनानिमित्त सर्व विद्यार्थिनींना उद्बोदनपर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ .आर.एल. निर्मळे - चौगुले मॅडम यांनी जागतिक महिला दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी स्त्री पुरुष समानता तसेच आजची स्त्री यावर मार्गदर्शन केले व स्त्रियांनी स्वातंत्र्य व स्वैराचार यातील फरक ओळखून स्वतःमध्ये कोणत्या प्रकारचे बदल घडवावेत याविषयी योग्य ते मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्षाच्या छात्राध्यापिका सरस्वती चव्हाण व दिपाली गुरव यांनी केले .
प्रास्ताविक अमृता चौगुले हिने,पाहुण्यांची ओळख शिवानी पाटील हिने व आभार श्रद्धा पवार यांनी केले.तसेच या कार्यक्रमास प्रा. शिरतोडे व्ही.एल., प्रा. डॉ.पवार ए. आर. , प्रा.सोरटे.एस.के.,प्रा. सावंत ए.पी., चौगुले एस.एस., पाटील पी. व्ही.तसेच प्रथम व द्वितीय वर्षाचे छात्राध्यापक, छात्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.