प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-लोकसभा निवडणुकीच्या निमीत्ताने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौरयांवर आलेल्या ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख मा.उध्दव ठाकरे यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची आज भेट घेतली.
महाविकास आघाडी कडुन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी निश्चित मानली जात असल्याने त्यांना बळ देण्यासाठी ही भेट घेतल्याचे बोलले जात आहे.या भेटीत औपचारिक चर्चा झाली असून तेथे उपस्थित असलेल्या सर्वा समक्ष चर्चा झाली आहे.या वेळी त्यांच्या सोबत तेजस ठाकरे ,खा.संजय राऊत,युवराज मालोजीराजे ,आ.वैभव नाईक ,संजयबाबा घाडगे ,संजय पवार ,रविकिरण इंगवले ,विजय देवणे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.