प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर-कोल्हापुरातील राजाराम रोड परिसरात असलेल्या आयसीआय बँकेच्या एटीएम मशीन मध्ये अनोळखी व्यक्तीने भरणा केलेल्या रक्कमेत 500 / रु.च्या 20 नोटा भरल्याचा प्रकार घडल्याने या बाबतची तक्रार बँकेच्या अधिकारी तृप्ती विजयकुमार कांबुज (वय 30) यांनी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
राजाराम रोड वर असलेल्या वसंत प्लाझा येथे आयसीआय बँकेचे एटीएम सेंटर आहे.या सेंटर मध्ये असलेल्या डिपॉझिट मशीन मध्ये अनोळखी व्यक्तीने 500/रु.च्या 20 नोटा भरणा केल्याचा प्रकार गुरुवारी (ता.28) रात्री 10च्या सुमारास हा प्रकार घडल्या बँकेच्या अधिकारयांच्या निदर्शनास आला असता ज्या खात्यावरुन पैसे जमा झाले त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.पण संबंधित खाते नंबरचा वापर दुसरयां व्यक्ती कडुनही होण्याची शक्यता असल्याने त्यामुळे बँकेचे अधिकारी यांनी या बाबतची फिर्याद शाहुपुरी पोलिस ठाण्यात दिल्याने शाहुपुरी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून एटीएम सेंटरवर असलेल्या सीसीटिव्ही फुटेज द्वारे माहिती घेऊन संशयीचा शोध घेतला जात आहे. या मशीन मध्ये बनावट ,जीर्ण आणि फाटलेल्या नोटांचा भरणा होऊ नये म्हणून या मशीन मध्ये अत्याधुनिक यंत्रणा कार्यरत असल्याने त्याला ही चुकवून बनावट नोटा जमा झाल्याने मशीनच्या कार्यपद्धती बद्दल शंका निर्माण होत आहे.