जबरदस्तीने पैसे आणि मोबाईल घेऊन मारहाण केल्या प्रकरणी आरोपीस दहा वर्षाची शिक्षा.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर-जबरदस्तीने खिशातील पैसे आणि मोबाईल घेऊन मारहाण केल्या प्रकरणी आरोपी राहुल उर्फ गोग्या रामू गवळी (31.रा.राजेंद्रनगर ) याला जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती कविता बी.अग्रवालसो यांनी आरोपीस दहा वर्षाची शिक्षा सुनावली आहे .

अधिक माहिती अशी की,एसटी स्टँड परिसरात 13/03/2018 यातील मयत श्रीधर पांडुरंग पवार (63.रा.निटवडे ,ता.भुदरगड )हे बस स्थानकाकडे चालत जात असताना आरोपी रामू गवळी याने त्यांच्या खिशातील पैसे आणि मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करु लागला त्यावेळी श्रीधर पवार यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांना लाथा बुक्यानी मारुन हाताचे ठोसे मारुन त्यांना खाली पाडून पुन्हा मारहाण केली त्यातच ते गंभीररित्या जखमी होऊन मयत झाले .या घटनेची फिर्याद पो.हे.कॉ.महेश देवराम कांबळे यांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यात दिली होती

.पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याच्या विरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.या गुन्हयांचा तपास शाहुपुरी पोलिस ठाण्याचे  तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.एस .आर.पवार यांनी केला होता.या कामी सरकारी वकील Ad.अमित महाडेश्वर यांनी काम पाहिले असून त्यानी आठ साक्षीदार  तपासले त्यापैकी दोघे फितुर झाले.उरलेल्या सहा साक्षीदारानी दिलेला जबाब आणि सरकारी वकील यांनी केलेला जोरदार युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीस दहा वर्षाची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड व दंड  न भरल्यास 6 महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे या दोन्ही शिक्षा आरोपीने एकत्रितपणे भोगण्या च्या आहेत. सरकार पक्षातर्फे Ad. अमित महाडेश्वर यांनी काम पाहिले असून त्यांना याकामी Ad.गजानन कोरे यांचे सहकार्य लाभले असून सहाय्यक फौजदार सुरेश परीट ,पो.हे.कॉ.शंकर माने यांची मदत झाली.

Post a Comment

Previous Post Next Post