प्रेयसी सह दोघांच्यावर गुन्हा दाखल.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- प्रियकराने लग्णाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या रागातुन प्रेयसीने मित्राच्या आणि मुलाच्या मदतीने प्रियकराचा दोरीने गळा आवळत खून करून त्याचा मृतदेह बँगेत घालून रात्रीच्या अंधारात निर्जन ठिकाणी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.पण पोलिसांच्या रात्रीची गस्त घालणारयां पोलिस पथकाने कोल्हापुर - आजरा रोडवर बहिरेवाडी घाटात संशयीत प्रेयसी आणि तरुणास अटक करून हा खूनाचा गुन्हा उघडकीस आणला .खून झालेल्या इसमाचे नाव गजेंद्र सुभाष बांडे (वय 33.रा.जिंतुर जि.परभणी) असे त्याचे नाव आहे.या प्रकरणी पोलिसांनी प्रेयसी सुनिता देवकाई (वय 44.)तर तिचा मुलगा सुरज देवकाई (दोघे रा.विठ्ठल देवळाजवळ खापोली ,ता.खानापूर जि.रायगड).आणि मित्र अमित पोटे (रा.सुळे ता.आजरा ) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.या तिघांच्यावर आजरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा खुनाचा गुन्हा उघड करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मदत केली.
गेल्या दोन वर्षांपासून गजेंद्र आणि सुनिता यांचे प्रेम संबंध असल्याने ते एकत्र रहात होते.गजेंद्र याने सुनिताला लग्ण करण्याचे आमिष दाखवून सुनिता कडुन पैसे घेतले होते.मात्र लग्नास नकार देऊन तो घेतलेले पैसे परत देणार नसल्याचे सुनिताला सांगत होता.या कारणातुन सुनिता गजेंद्रवर चिडून होती.27 मार्च ला गजेंद्रला दुधातुन झोपेच्या गोळ्या घालून गजेंद्र बेशुध्दावस्थेत असताना सुनिताने आपला मित्र अमित पोटे याला बोलावून घेऊन दोघांनी मिळून गजेंद्रचा गळा आवळत खून केला.त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याच्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचे नियोजन करून बाजारातुन एक प्रवासी बँग आणून मृतदेहाचे हात पाय बांधून बँगेत ठेवला .एक कार भाड्याने घेऊन तिघे जण कोल्हापूरच्या दिशेने येताना आजरा तालुक्यातील बहिरेवाडी चेक पोस्ट नाक्या जवळ येताच पोलिस आपली गाडी चेक करतील या भीतीने सुनिताने कार चालकास गाडी वेगाने चालविण्यास सांगितले असता कार चालक भर वेगाने पुढे आला.गस्तीतील पोलिसांना संशय आल्याने त्यानी सर्व गस्त पथकाला फोनवरुन याची माहिती दिली त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक त्या परिसरात गस्त घालत असताना आजरा -निपाणी रोडवर एका घाटात सुनिताने कार थांबवून बँगेतुन मृतदेह बाहेर काढ़ून एका झुडपात नेऊन त्याच्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करत असताना हा प्रकार पोलिसांच्या लक्ष्यात येताच पोलिस पथकाने सुनितासह दोघांना अटक करून गजेंद्रचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता सुनिताने आपणच खून केल्याची कबुली दिली अ सता आजरा पोलिस ठाण्यात सुनितासह तिचा मित्र आणि मुलग्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.