प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- आज स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने दुचाकी चोरटा रफिक मुल्ला (रा .सरवडे) याला ताब्यात घेऊन त्याच्या कडील एक लाख रुपये किमंतीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
कोल्हापुर शहरात आणि उपनगरात होत असलेल्या दुचाकी चोरीच्या प्रमाणात वाढ़ होत असल्याने वरिष्ठ अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या .त्या अनुशंगाने तपास करीत असताना एक दुचाकी चोरटा शिवाजी विद्यापीठ परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली अ सता त्या ठिकाणी सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली अ सता त्याच्या कडील एक लाख किमंतीच्या दोन मोटारसायकली जप्त केल्या .
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,सहा.पोलिस निरीक्षक सागर वाघ यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.