फरारी आरोपीला करवीर पोलिसांनी केली अटक.



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर - चंबुखडी येथे  डिसेबरला 23 मध्ये झालेल्या खूनाच्या प्रयत्नात फरारी असलेला आणि करवीर पोलिसांत आणि जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला फरारी आरोपी त्रिमुख उर्फ त्र्यंबक वसंत गवळी (रा.राजेद्रनगर) याला करवीर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

डिसेबर 23 मध्ये झालेल्या खून प्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता तसेच त्याच्या विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यातही एका प्रकरणात गुन्हा दाखल असून तो पोलिसांना चकवा देत होता.

करवीरचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे ,हवालदार विजय कळसकर आणि सुभाष सरवडेकर यांनी व त्यांच्या पथकाने राजेद्रनगरात जाऊन कारवाई करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post