प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-जेल मधून जामिनावर बाहेर आलेला खूनाच्या गुन्हयातील संशयीत वृषभ उर्फ मगर विजय साळोखे (वय 21.रामानंदनगर ,को.) याची कार मधून मिरवणूक काढल्या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी आठ जणांच्यावर गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे.
मिरवणूकीची घटना 19 मार्चला घडली होती.त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता.त्या व्हिडीओचा दखल घेऊन जुना राजवाडा पोलिसांनी स्वतःच गुन्हा दाखल करून ही अटकेची कारवाई केली.अटक केलेल्यात वृषभ साळोखेसह अनिकेत किरण शिरदवाडे (रा.वारे वसाहत)अवधूत खटावकर (रा.हनुमाननगर,पाचगाव)विजय साळोखे आणि पृथ्वीराज विलास आवळे या चौघांचा अटक केलेल्यात समावेश आहे.तर आदित्य कांबळे आणि रोहित चौगुले आणि धिरज राजेश शर्मा यांचा पोलिस शोध घेत आहेत.
या प्रकरणी कॉन्स्टेबल सागर डोंगरे यांनी फिर्याद दिली.जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार वृषभ हा खूनाच्या गुन्हयातील संशयीत असून त्याच्यावर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्याची कंळबा जेल मध्ये रवानगी केली होती.19 मार्चला तो जामिनावर बाहेर आला होता.जेलच्या बाहेर त्याच्या साथीदारांनी स्वागत करून मिरवणूक काढण्यात आली होती.याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलिसांनी कारवाई केली.
साळोखेच्या साथीदारांनी "किंग इज ब्यक ,अब तुम्हारी खैर नही,हमारा भाई वापस आया "असा उल्लेख असलेला व्हायरल व्हिडीओ पोलिसांच्या रडारवर आल्याने संशयीतावर कारवाई केली.
आज या चौघांना ज्या भागात त्यांचा प्रभाव आहे त्या भागात भर ऊन्हात चालत अनवानी फिरवल्याचे सांगितले.
त्या चौघांना न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्याची माहिती पोलिसांना दिली.