प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर - शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती ए.एस.वाईकरसो यांनी आरोपी 1)संदिप आनंदा जंगम आणि 2) अमित मारुती सनदी (दोघे रा.उजळाई कॉलनी, सरनोबतवाडी ) या दोघांना दोषी ठरवून न्यायालयाने कोर्ट उठे प्रर्यत शिक्षेसह एक हजारांचा दंड आणि दंड न भरल्यास 8 दिवसाची साधी कैद.अशी शिक्षा सुनावली आहे .सरकारी वकील म्हणून Ad.राजेश बी.चव्हाण यांनी काम पाहिले.
अधिक माहिती अशी की,यातील फिर्यादी शहाजी आनंदा ढ़ेकळे (रा.टिकेवाडी ,भुदरगड को.) हे एसटी ड्रायव्हर असून 07/12/2014 रोजी मुरगूड हून राधानगरीकडे जात असताना आरोपीनी त्यांच्या गाडी पुढ़े आपली इंडिका कार (MH-09 CM-3262) आडवी लावून शहाजी ढ़ेकळे यांना शिवीगाळ करुन मारहाण करू लागले तेव्हा वाहक रविंद्र गणपती बुजरे यांनी का मारता म्हणताच त्यांनाही मारहाण करून मिनी बसवर दगडफेक करून नुकसान करून शासकिय कामात अ डथळा आणल्या प्रकरणी या दोघां विरोधात राधानगरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.त्या नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.
या खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश मा.श्रीमती ए.एस.वाईकरसो यांच्या कोर्टात चालून सरकारी पक्षातर्फे Ad.राजेश चव्हाण यांनी काम पाहिले त्यानी पाच साक्षीदार तपासले .साक्षीदारानी दिलेली साक्ष आणि सरकारी वकील यांनी केलेला युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य मानुन मा.न्यायाधीशानी आरोपी संदिप जंगम आणि अमित सनदी यांनी दोषी ठरवून या दोघांना कोर्ट उठे प्रर्यत शिक्षेसह एक हजारांचा दंड व दंड न भरल्यास 8 दिवसांची साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे .या गुन्हयाचा तपास राधानगरी पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहा.फौजदार ए.ए.सुरंगे यांनी केला असून त्याना या कामी पो.कॉ.विक्रम पाटील यांनी मदत केली.