जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ डोसपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या -जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचना

 राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

   


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर :  छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते लहान बालकाला पोलिओ डोस पाजून करण्यात आला. 

     जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. सीपीआर येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी श्री. येडगे व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. 

यावेळी जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई, अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. थोरात, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.फारुक देसाई, उपअधिष्ठाता तथा मानसोपचार विभाग प्रमुख डॉ. पवन खोत, बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर सरवदे, कान नाक घसा विभाग प्रमुख डॉ. अजित लोकरे, स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.शिरीष शानबाग यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख व वैद्यकीय तज्ञ उपस्थित होते. 

     जिल्ह्यातील प्रत्येक पालकाने आपल्या 0 ते 5 वयोगटातील बालकांना पोलिओ डोस देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करुन पोलिओ डोस पासून जिल्ह्यातील एकही बालक वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच बूथवर व गृह भेटी द्वारे देण्यात येणाऱ्या डोस बरोबरच वाड्या, वस्त्यांवरील तसेच फिरते कामगार व ऊसतोड मजुरांची बालकेही डोस पासून वंचित राहणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी दिल्या.

     कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांनी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी आरोग्य विभागाने केलेल्या तयारीची माहिती दिली. कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    

Post a Comment

Previous Post Next Post