प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर-ट्राफिक पोलिसांनी रंगपंचमीच्या निमित्ताने शहरात नाकाबंदी करून प्रत्येक ठिक ठिकाणी पोलिस बंदोबस्त नेमून दारु पिऊन हुल्ल्डबाजी करणाऱ्या आणि वाहतकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या 503 वाहन चालकांच्यावर दंडात्मक कारवाई करून 3 लाख 66 हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
यात 11 जणाच्यावर दारु पिऊन वाहन चालविल्या प्रकरणी ताब्यात घेऊन न्यायालयात खटला दाखल करण्यात आला.या रंगपंचमीच्या निमीत्ताने तरुणांच्यात होणारे वाद त्यातुन होणारी मारहाण तसेच तरुणीच्या आणि महिलांच्या अंगावर रंग उडाल्याने होणारी भांडणं या सारखे प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी जिल्हा बरोबर शहरात ठिकठिकाणी पोलिस कारवाई करत असल्याचे दिसत होते.शहर वाहतूक शाखेच्या विभागाने सकाळ पासून संध्याकाळ पर्यन्त पोलिसांची कारवाई चालू होती.
अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई , स्थानिक गुन्हें अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर यांच्यासह शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे आणि सर्व पोलिस ठाण्याकडील प्रभारी अधिकारी आपआपल्या हद्दीत गस्त घालत होते.या वेळी अग्निशामन दलाचे जवान शहरातील पंचगंगा नदी आणि ग्रामीण भागात तलावाच्या ठिकाणी कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून लक्ष ठेऊन होते.
शहर वाहतूक शाखेने केलेल्या कारवाईत 132 ट्रीपल सिट तर 124 जणाच्यावर लायसन्स जवळ नसलेल्याचा या दंडात्मक कारवाईत समावेश आहे.