आरोग्य शिबीरात 248 महिला कर्मचाऱ्यांची तपासणी


प्रेस मीडिया लाईव्ह ;

संभाजी चौगुले :

कोल्हापूर : महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रूणालयात 248 महापालिका महिला कर्मचा-यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 8 मार्च जागतिक महिला दिनानिमीत्त सावित्रीबाई फुले रुग्णालयात या तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य तपासणी शिबीराचा शुभारंभ प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व रोपास पाणी घालून याचा शुभारंभ करण्यात आला. या शिबीरामध्ये महिलांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली.

            प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी यावेळी बोलताना महिला कर्मचारी यांनी आजारी पडण्या अगोदरच आपली आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. तुंम्ही जसे कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेता तसेच स्वत:च्याही आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. या आरोग्य तपासणीमधून ज्या महिला कर्मचाऱ्यांना एखाद्या आजारासाठी खाजगी रुग्णालयात तपासणीची आवश्यकता आहे त्यांना महापालिकेमार्फत जरुर ती मदत करण्यात येईल. आज ज्या महिला कर्मचारी उपस्थित नाहीत त्यांनी उद्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात आपल्या आरोग्याची तपासणी करुन घ्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

            या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशासकीय वैद्यकिय अधिकारी डॉ.मंजूश्री रोहिदास यांनी केले. यामध्ये त्यांनी या आरोग्य तपासणी शिबीरामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, रक्तक्षय व इतर आराजारांकरीता सीबीसी, थायरॉईड, ब्लड शुगर व इतर 14 प्रकारच्या आरोग्य तपासण्या करण्यात येणार असलेचे सांगितले.      

            यावेळी उप-आयुक्त साधना पाटील, शिल्पा दरेकर, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, आरसीएच नोडल ऑफिसर डॉ.अमोल माने, महिला व बाल कल्याण विभागाच्या अधिक्षक सौ.प्रिती घाटोळे व सावित्रीबाई फुले रुग्णालयाकडील स्टाफ व महिला कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post