क्राईम न्यूज : एका शिक्षीकेच्या नावाने बनावट इंन्स्ट्राग्राम खाते काढ़ल्या प्रकरणी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - कोल्हापुरात एका शाळेत कार्यलत असलेल्या शिक्षीकेचे बनावट इंन्स्ट्राग्राम खाते काढ़ून विद्यार्थाना पाठविल्याचा प्रकार त्या पीडीत शिक्षीकेस समजताच या बाबतची तक्रार राजारामपुरी पोलिस ठाण्यात पीडीत शिक्षीकेने दिली आहे.

अनोळखी व्यक्तीने त्या शिक्षीकेच्या नावाने इंन्स्ट्राग्रामवर चार खाती तयार करून त्या विद्यार्थाना पाठविल्या आणि त्यानंतर एडिट केलेले अश्लिल व्हिडीओ व फोटो पाठवून घाणेरड्या शब्दात मेसेज लिहून पाठवल्या चा प्रकार  25 ते 28 मार्च या दरम्यान घडल्याच निदर्शनास आले आहे.थेट पीडीत शिक्षीकेच्या खात्यावरुन अश्लिल मेसेज आल्याने विद्यार्थीवर्गात आणि पालकांच्यात मोठी खळबळ उडाली.आपल्या नावाने बनावट खाती तयार करून बदनामी केल्याचा घाणेरडा प्रकार लक्ष्यात येताच पीडीत शिक्षीकेने राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कामी सायबर पोलिसांची मदत बनावट खाती तयार करण्यारयाचा शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post