प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- वाघबीळ पेट्रोल पंपा समोर गाडी स्लिप होऊन संजय पांडुरंग पाटील (वय .45.रा.पिशवी ,शाहुवाडी ) हे गंभीर रित्या जखमी झाल्याने त्यांना तेथील काही महिलांनी खाजगी गाडीतुन सीपीआर रुग्णालयात दाखल केले असून त्याचा उपचार चालू असताना मयत झाल्याने डॉक्टरांनी सांगितले.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकित झाली नव्हती.
आज ता.16/03/2024 रोजी सव्वा दोनच्या सुमारास हा अपघात झाला असून तेथे असलेल्या हॉटेल मध्ये काम करीत असलेल्या महिलांनी उपचारा करीता सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्या हॉटेल मध्ये काम करीत असलेली महिला कपीला अंकुश महापुरे (मो.नं.9325647050)यांनी दाखल केले असून जखमी म्हणुन नोंद केली आहे.त्या इसमाचा मयत झाल्याचे समजताच सदर महिला गायब झाल्याचे समजते.
येथील सीपीआर पोलिस चौकित असलेल्या पोलिसांनी या घटनेची माहिती कोडोली पोलिसांना फोटो सहित माहिती पाठविली असता प्रथम हद्दीचा मुद्दा पुढ़े करून तुम्हीच माहिती घेऊन नातेवाईकांचा शोध घेण्यास कोडोली पोलिसांनी सीपीआर मध्ये ड्युटीवर असलेल्यांना सांगितले.खरं म्हणजे हे काम त्या पोलिस ठाण्याचे आहे.या सीपीआर रुग्णालयात अनेक रुग्ण या रुग्णालयात येत असतात त्याची वर्दी घेणे या पोलिसांचे असते.
सदर मयताचे अपघातात पाठीचे पुर्ण सालटे गेलेले आहेत.येथील पोलिसांनी मयताच्या नातेवाईकांना मोबाईल वरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण रिप्लाय मिळालाच नाही.येथील सीपीआर मधील पोलिस चौकीत चार जिल्हयातील पेंशट त्यात पॉयझन ,मारामारी ,अपघात आणि गळफास या सारखे पेशट येत असतात.त्या वेळी गंभीर गुन्हयांची माहिती तात्काळ पाठवले जाते.