कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- कोल्हापुर शहर आणि उपनगरासह ग्रामीण भागात अवैद्य व्यवसाय आणि ड्रग्जचा व्यवसायाने थैमान घातले असून या व्यवसायात बेरोजगारांना भरपूर कमीशन देण्याचे आमिष दाखवून गैरमार्गाला लावले जात आहे.यात शाळा कॉलेजची युवा पिढी अंमली पदार्थांच्या जाळ्यात अडकून आपल्या मौल्यवान आयुष्याच्या चिंध्या करीत आहेत.या साठी जिल्हयातील ड्रग्ज माफियांच्या मुसक्या आवळून कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याच्या मागणी साठी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या वतीने मंगळवारी पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी निवेदन दिले.
तसेच शहरातील टपरयां वर गांजा ,मावा आणि इतर अंमली पदार्थांच्या विक्री राजरोस विक्री होत आहेत.या अंमली पदार्थांच्या सध्याची तरुण पिढ़ी आहारी जाऊन गुन्हेगारीकडे वळत असल्याचे दिसते.पुणे पोलिसांनी बावीशे कोटीचा अकराशे किलो अंमली पदार्थ जप्त करून संबंधितावर कारवाई केली होती.याच पद्धतीने शहरात ठिकठिकाणी असलेल्या ठिकाणाहून होत असलेली अंमली पदार्थांची तस्करी खुल्लेआम चालू आहे मात्र पोलिसांचे या कडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.
यावेळी जिल्हाध्यक्ष व्हि.बी.पाटील ,शहराध्यक्ष आर.के.पोवार ,जयकुमार शिंदे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी जिल्हयातील सर्व पोलिस ठाण्यांना कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी सांगितले.