ट्रक आणि मारुती ब्रिझा यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत मंगळवार पेठेतील 4 जण गंभीर जखमी.

  राधानगरी येथील दाऊदवाडी येथील घटना.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर /राधानगरी - कोल्हापुरातील मंगळवारपेठ येथील अविनाश शिंदे हे आपल्या कुंटुबिया समवेत गोव्याहून कोल्हापुरच्या दिशेने आपल्या मारुती ब्रिझा या गाडीतुन येत असताना दाऊदवाडी (राधानगरी) येथे मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ट्रक ड्रायव्हरने गाडी नं. एमएच -07 एजे -1905 . या ट्रकने यांच्या गाडीला जोरदार दिलेल्या धडकेत अविनाश शिंदे यांच्या कारचे गाडी नं.बीएच-23 जी -6981.या कारचे मोठे नुकसान होऊन अविनाश शिंदे यांच्यासह श्रीमती कमल शिंदे,सौ पूनम शिंदे आणि कु.प्रणिल शिंदे हे जखमी झाले असून त्यांना कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.या अपघाताची माहिती राधानगरी पोलिसांना कळवून जखमी फिर्यादी रुग्णालयातुन लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मद्यपान करुन गाडी चालवून अपघातास जबाबदार असलेल्या ट्रक ड्रायव्हरसह त्यांच्या मालकावरही कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शिंदे यांच्या नातेवाईकांनी पोलिसांच्याकडे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post