स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- चोरीतील दागिने विक्री साठी आलेल्या अब्दुल मौला मुल्ला (20)आणि निखील राजू बागडी(20 रा.दोघे रा.धनगर गल्ली ,रुकडी ) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक करून त्यांच्या कडील 22 ग्राम .सोन्याचे दागिने आणि इतर असा 3 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त करून त्याना अटक केली आहे.
शहरात आणि जिल्हयात सोन्याच्या दागिने हिसकावून पलायन केलेल्या चोरीच्या गुन्हयांत होत असलेली वाढ या मुळे वरिष्ठ अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकास शोध घेण्याचे आदेश दिले होते.त्या अनुशंगाने तपास करीत असताना वडगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद असलेल्या गुन्हयातील आरोपी अब्दुल मुल्ला आणि निखील बागडी हे दोघे चोरीतील दागिने स्प्लेंडर गाडी वरुन पंचगंगा पुलाजवळ असलेल्या पीर बाबाच्या दर्गा जवळ येणार असल्याची माहिती मिळाली अ सता त्या ठिकाणी सापळा रचून त्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी वडगाव पोलिस ठाण्यासह करवीर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याची कबुली दिली असता त्या दोघांच्या अंगझडतीत चोरीचे दागिने आणि वापरलेली स्प्लेंडर दुचाकी असा 3 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या गुन्हयासह आकुर्डे आणि मठगाव येथील मंदीरातही चोरी केल्याची कबुली दिली.त्या दोघांना पुढ़ील तपासासाठी वडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर वाघ आणि पोलिस उपनिरीक्षक संदिप जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.