राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कागल येथे शुभारंभ

 दोन थेंब प्रत्येक वेळी,

पोलिओवर विजय दरवेळी..!


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

 कोल्हापूर : सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय पल्स 'पोलिओ लसीकरण मोहीम' रविवार, दि. ३ मार्च २०२४ रोजी संपूर्ण राज्यभरात राबविली जात आहे. राज्यातील शून्य ते पाच वयोगटातील सर्व बालकांसाठी यादिवशी पोलिओ रविवार राबवला जात आहे.

आज कागल मधील खर्डेकर चौक येथे जिल्हा परिषदेच्या दवाखान्यात राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पोलिओ डोस देण्याचा शुभारंभ झाला.

यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, डॉ. राजेश गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी फारुक देसाई, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी, डॉ. उमेश कदम, अधीक्षक डॉ. सुनीता पाटील, अधीक्षक ग्रामीण रुग्णालय कागल, डॉ. अश्विनी राजमाने वैद्यकीय अधिकारी, श्री नासिर नाईक आरोग्य सहाय्यक, श्री अमर पाटील, प्रसिद्ध अधिकारी व आरोग्य विभागाकडील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

  

Post a Comment

Previous Post Next Post