युनियन बँक ऑफ इंडियाला बनावट सोने तारण देऊन 57 लाखांची फसवणूक केलेल्या आणखी तिघांना अटक.



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर-लक्ष्मीपुरी येथे असलेल्या युनियन बँक ऑफ इंडियाला बनावट सोने तारण देऊन फसवणूक केल्या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली आहे.

या बँकेचा मुल्यांकनकार सागर कलघटगी याने सोने तारण ठेवण्यास येणारयां कर्जदाराशी संगनमत करुन बनावट सोने खरा असल्याचा बँकेस अहवाल सादर करुन काही कर्जदारांनी 14 लाखाचे कर्ज घेऊन सुरुवातीचे काही हप्ते भरुन पुढ़चे हप्ते भरण्यास टाळाटाळ केली असता हा प्रकार बँकेच्या अंतर्गत तपासणीत लक्ष्यात आल्याने कर्जदार आणि त्यांना मदत करणारा मुल्यांकनकार यांचा भांडाफोड करण्यात आला.

याची आणखी व्याप्ती वाढ़ण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या गुन्हयातील मारुती सखाराम कोल्ह्टकर (22 .रा.मणेरमळा,उचगाव),  सादिक सिंकदर शेख ( 22.रा.कबनूर ,हातकंणगले ) तसेच सुजित उर्फ सुहास साताप्पा मोहिते (36.रा.सानेगुरुजी वसाहत,को ) या तिघां जणाना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक करून पुढ़ील तपासासाठी लक्ष्मीपुरी पोलिसांच्या ताब्यात देऊन लक्ष्मीपुरी पोलिसांनी त्यांना  न्यायालयात हजर केले असता या तिघांना सोमवारप्रर्यंत (ता.11) पोलिस कोठडी सुनावली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post