प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापुर- गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या प्रकरणी समावेश असलेला आरोपी डॉ.विजय गोपाळ नारकर (63रा.साखरपा ). हा करवीर पोलिसांच्या हाती लागला असून करवीर पोलिसांनी डॉ.नारकर यांच्या हॉस्पिटल मध्ये छापा टाकून गर्भपाताच्या औषधांचा साठा जप्त करून डॉ.नारकर याला अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता 11 मार्च प्रर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.
तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आरोग्य विभाग आणि करवीर पोलिसांनी क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथे जानेवारी महिन्यात एका घरात छापा टाकून कारवाई केली होती.त्या कारवाईत गर्भलिंग निदान आणि गर्भपात करीत असल्याचे निदर्शनास आले होते.या गुन्हयात एका अधिकृत डॉक्टरसह एक बोगस डॉक्टर,टेक्निशयन आणि एंजन्टासह आठ जणांना अटक केली होती.त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत साखरपा येथील डॉ विजय नारकर याचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले.डॉ.विजय नारकर यांनी आता प्रर्यत शंभरच्यावर महिलांचा गर्भपात केल्याचे दिसून आल्याने करवीर पोलिसांनी नारकर याला अटक केली.