प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-पन्हाळा येथे असलेल्या "हॉटेल रसना लॉजिंग बोर्डिंग व गार्डन".येथे बेकायदेशीर वेश्या व्यवसाय चालविणारा भगवान पांडुरंग भाकरे (वय 45.रा.हॉटेल रसना लॉजिंग बोर्डिंग व गार्डन,पन्हाळा) आणि शुभम झुंझारराव जाधव (वय.26.रा मणेरमळा,उचगाव) या दोघांना पन्हाळा पोलिसांनी अटक करून पीडीत महिलेची सुटका केली. पन्हाळा पोलिसांनी या दोघांच्यावर गुन्हा दाखल करून त्याना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.अधिक माहिती अशी की ,पन्हाळा येथे असलेल्या हॉटेल रसना लॉजिंग बोर्डिग व गार्डन येथे बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसाय चालू असल्याची माहिती पन्हाळा पोलिसांना मिळाली असता त्यानी बनावट गिर्हाईक पाठवून खात्री करून त्या हॉटेल वर छापा टाकून या दोघांना ताब्यात घेऊन पीडीत महिलेची सुटका करून रोख रक्कम आणि 2 मोबाईल 1 रजिस्टर तसेच निरोध पाकिटे असा 32 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.यातील पीडीत महिलेकडे पोलिसांनी चौकशी केली असता आर्थिक गरजेपोटी भाकरे यांच्याकडे हा व्यवसाय करत असल्याचे सांगून त्या बदल्यात एक हजार रुपये मिळत असल्याचे सांगितले.
ही कारवाई पन्हाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश इंगळे,अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाचे सहा.पोलिस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.