प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- गुजरीतील 12 लाखांचे सोने घेऊन पळून गेलेला परप्रांतिय कारागिर सुभोजित अमया घोडई (22.पश्चिम बंगाल) याला जुना राजवाडा पोलिसांनी अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.
यातील मुख्य संशयीत प्रल्हाद सनातन क्षेत्रपाल आणि त्याच्या इतर साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत.जुना राजवाडाचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे ,उपनिरीक्षक पुजारी आणि प्रकाश संकपाळ यांच्या टिमने पश्चिम बंगाल येथे जाऊन त्याचा शोध घेऊन सुभोजित याला ताब्यात घेऊन अटक केली.गुजरीतील सराफ व्यावसायिकांचा विश्वास संपादन करून एका रात्रीत सोन्यासह हे टोळके पसार झाले होते.याची फिर्याद सुमित प्रामाणिक यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली होती.त्यानुसार पोलिसांनी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.