प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- महानगरपालिका ते भाऊसिंगजी रोडवर एका हॉस्पिटलच्या दारात भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या हल्यात सुष्टि सुनिल शिंदे (21.विशाळगडकर कंपाऊड, नागाळा पार्क ) ही गंभीर जखमी झाली होती.ही घटना 3 फ़ेब्रुवारी घडली असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार चालू होते.
दरम्यान सुष्टिला रविवारी रात्री सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.पहाटेच्या सुमारास तिचा मृत्यु झाला.या घटनेने नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.3 फ़ेब्रुवारीला या कुत्र्याने 10 ते 12 लोकांचा चावा घेतला होता.या सर्वाचे सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून रेबिजचे इंजेक्शनही दिले होते.
या घटनेने अशा प्रकारे तरुणीचा मृत्यु झाल्याने नागरिकांच्यातुन संतापाची लाट उसळली आहे.आता तरी महानगरपालिकेचा संबंधित विभाग भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणार का अशी विचारणा नागरिकांच्या कडुन होत आहे.महानगरपालिका परिसरातच ह्या भटक्या कुत्र्याचा वावर आहे.पण संबंधित विभागाला दिसत नाही.तरी संबंधित विभागाने शहरातल्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.