प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर जाधव :
कोल्हापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथील स्मारक व येथील विकास कामांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत मौजे माणगांव ता. हातकणंगले येथे शुक्रवार दि. 8 मार्च 2024 रोजी दुपारी 12 वाजता संपन्न होणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्मारक व प्रवेशव्दार उभारण्यासाठी २ कोटी ३८ लाख ६३ हजार रुपयांच्या रक्कमेस सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. या निधीतून माणगाव येथील मुख्य प्रवेशद्वार, लंडन हाऊस, होलोग्राफिक शो व तक्क्या इमारत सुशोभिकरण इ. विकास कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या विकास कामांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या लोकार्पण सोहळ्यास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.
****.