शहर वाहतूक शाखेच्या वतीने 3738 वाहनांवर दंडात्मक कारवाई करुन 38 लाख 58 हजार 500/ रु.दंड वसूल.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर : कोल्हापुर शहरात होत असलेली वाहनाची वाढ़ तसेच वाहतुकीस होत असलेली कोंडी आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून शहरातील नागरिकांना आणि बाहेरुन येणारयां प्रर्यटकांना पार्किंग साठी होणारा त्रास या पाश्वभुमीवर शहर वाहतूक शाखेच्या वतीने जानेवारी आणि फ़ेब्रुवारीत विशेष मोहिम राबवून वाहतुकीचे नियम तोडणारयां अशा 3738 वाहन चालकांवर कारवाई करून 38लाख 58हजार 500/ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

यात  60 वाहन चालकांच्यावर मद्य प्राशन करून वाहन चालविल्या प्रकरणी न्यायालयात खटला दाखल करून दंड वसूल केल्याचा समावेश आहे. या कारवाईत भरधाव वेगाने गाडी चालविणे ,वनवेत प्रवेश करणे ,नंबर प्लेट नसणे ,वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे ,ट्रीपल सिट,बेकायदेशीर वाहतूक करून वाहनांची कोंडी करणे आणि विना परवाना वाहन चालविणे आदीचा समावेश आहे.

  या पुढ़ेही मोठ्या प्रमाणात अशा वाहनधारकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे कोल्हापूर शहर वाहतूक शाखेचे नंदकुमार मोरे यांनी सांगितले.

तसेच प्रत्येक वाहनधारकांने नियमाचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post