प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर-भाचीने आपल्या मैत्रिणीच्या मदतीने चैनी आणि मौजमजा करण्यासाठी आत्याचे घर फोडून सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम लांबवल्या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन भाचीसह मैत्रिण स्वाती सुदर्शन कांबळे (वय .19.रा.नवीन चिखली/सोनतळी). हिला अटक केली असून संशयीता कडुन 20 हजाराची रोख रक्कमेसह 23gm. वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे.या दोघीनी चोरी केल्याची कबुली देऊन चोरलेला मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात दिला.
अधिक माहिती अशी की,सोनतळी येथे रुक्साना शाहरुख झाडी (वय 35) या लहान मुला सोबत रहात असून त्या कोल्हापुरातील रुग्णालयात नोकरीस आहेत.त्या आपल्या भावाच्या मुलीचा सर्व खर्च करून तिचा लाडही करीत होत्या.त्या भाचीवर विश्वास ठेऊन नोकरीस जात असत.गुरुवारी (21) झाडी या कामावर गेल्या होत्या सकाळी परत आल्यावर सर्व साहित्य विस्टटलेले होते.त्याच प्रमाणे बँगा आणि कपाटे उघडून त्यातील 20 हजाराची रोकड आणि 23 gm.सोन्याचे दागिने लांबवल्याची आढ़ळले असता त्यानी करवीर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.झाडी यांच्या घरी भाचीसह तिची मैत्रीण ऊपस्थित होती.आत्याची तिने विचारपूस ही केली होती.घटना स्थळी करवीरचे पोलिस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर आणि करवीरचे पोलिस निरिक्षक किशोर शिंदे यांनी पहाणी केली होती.पोलिसांना सोनतळी येथील दोन मुली वडणगे फाटा येथे सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याचे समजले वरून तेथे सापळा रचून मोपेड वरुन आलेल्या मुलीना ताब्यात घेऊन मोपेडची पहाणी केली असता रोख रक्कम आणि दागीने सापडले.त्याच्यावर चौकशी केली असता चोरीची कबुली दिली.