प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता.१३ सध्याच्या समाजातील स्त्रीविषयक नकारात्मक दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे . तो बदलायचा असेल तर प्रत्येकाने विवेकवादी विचारांची कास धरणे आवश्यक आहे. आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले व फातीमा शेख यांच्या विचाराची चळवळ निर्माण झाली पाहिजे. तसेच समतेचे मूल्य सर्वानी स्विकारले पाहिजे असे मत ज्येष्ठ राजकिय विश्लेषक प्रा.डॉ भारती पाटील यांनी व्यक्त केले. त्या कै . शारदाताई गोविंदराव पवार अध्यासन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर - समाजवादी प्रबोधिनी इचलकरंजी व नाईट कॉलेज इचलकरंजी या च्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित 'स्त्रियांचे सक्षमीकरण आणि त्यापुढील आव्हाने 'या एकदिवसीय कार्यशाळेत प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शशांक बावचकर होते. यावेळी मंचावर समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी, इचलकरंजी को-ऑप इंडस्ट्रीयल इस्टेट चे अध्यक्ष राहूल खंजिरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पुरंधर नारे उपस्थित होते.प्रास्तविक व स्वागत प्रा. डॉ सचिन चव्हाण यांनी तर प्रमुख पाहुण्यांंचा परिचय डॉ सबिहा सय्यद यांनी करुन दिला.
द्वितीय सत्रात बोलताना समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी म्हणाले स्त्रीयांना माणूस म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे तसेच समाजजीवनातील बदल स्विकारून शैक्षणिक प्रगती केली पाहिजे त्यामुळे स्त्रीया अधिक सक्षम होवून समाजाची सर्वांगीण प्रगती साधता येईल.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना शशांक बावचकर म्हणाले, आज महिलांनी अन्यायाविरुद्ध प्रश्न खुलेपणाने मांडले पाहिजेत. समाजातील पुरुषवर्गाने स्त्रीयांना दुय्यम स्थान न देता समतेचे मूल्य स्विकारले पाहिजे. स्त्रियांना समाजामध्ये मानसन्मान मिळाला पाहिजे याविषयी स्त्रीजागृती होणे गरजेचे आहे.कार्यशाळा संपन्न झाल्यावर आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले व फातीमा शेख यांच्या पुण्यतिथी निमित्त व आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महाविद्यालयातीळ ऊर्दू विभाग व महिला मंचच्या वतीने भित्ती पत्रिकेचे उदघाटन करण्यात आले. डॉ.भारती पाटील, प्रा. डॉ. सबिहा सय्यद व प्रा. स्मिता मंथेरो यांनी कार्यशाळेत मुलीच्या जीवनविषयक आव्हाना विषयी विद्याथिर्नीशी संवाद साधला.सुत्रसंचलन प्रा .डॉ जीवन पाटील व प्रा. एफ. एन. पटेल यांनी केले. प्रा.स्मिता मंथेरो यांनी आभार मानले.