प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता. ३ वाढती जात्यांधता व धर्मांधता यांच्या बजबजपुरीत मानव धर्माची शिकवण देणे आणि तो प्रस्थापित करण्यास प्रयत्न करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. ते काम हा चित्रपट करतो.सहज चिरडून मारल्या जाणाऱ्या कीटकांचं रक्त दिसत नाही. त्या रक्ताला हिमोलिंफ म्हणतात. मुंबई ७/११ बॉम्ब स्फोटांत वेगवेगळ्या स्तरातून भरडल्या गेलेल्या सर्व सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून देशातील अगणित निरपराध कैद्यांचं वास्तव चितारणारा 'हिमोलिंफ: इन्व्हिसिबल ब्लड' हा सिनेमा त्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. गोविंद निलहानी ,अमोल पालेकर ,न्यायमूर्ती ठीपसे, डॉ.आनंद तेलतुंबडे यासारख्या विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरानी चित्रपटाबद्दल व्यक्त केलेली मते त्याचे महत्त्व अधोरेखित करतात. कारण समाज जीवनाच्या सर्व क्षेत्रात भारतीय संविधानातील तत्वे अंगीकारणे महत्त्वाचे आहे असे मत या चित्रपटानंतरच्या चर्चेतून व्यक्त करण्यात आले. समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालय यांच्या हा चित्रपट दाखवण्यात आला वतीने दाखवण्यात आला. तसेच या चित्रपटावर मुक्त संवादही झाला.
यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक सुदर्शन गमरे , लेखक व नायक अब्दुल वाहिद आणि सामाजिक कार्यकर्ते सुबोध मोरे (मुंबई) उपस्थित होते.
स्वागत व प्रस्ताविक प्रसाद कुलकर्णी यांनी केले.पाहुण्यांचा सत्कार ग्रंथ भेट देऊन अजितमामा जाधव, अहमद मुजावर व साहिल शेख यांच्या हस्ते करण्यात आला.केले. यावेळी झालेल्या चर्चेत संजय रेंदाळकर, दामोदर कोळी,अहमद मुजावर,प्रा.शांताराम कांबळे,प्रा. वाय.एम.चव्हाण, साहिल शेख, शकील मुल्ला,तुकाराम अपराध इत्यादींनी आपली मते व्यक्त केली. तसेच अब्दुल वाहिद ,सुबोध मोरे आणि सुदर्शन गमरे यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांना शंकांना समर्पक उत्तरे दिली. प्रसाद कुलकर्णी यांनी या चर्चेचा समारोप केला.
दोन तासांच्या अवधीच्या या चित्रपटात डॉ. रियाझ अन्वर , रोहित कोकाटे , रुचिरा जाधव , मेजर विक्रमजीत व सागर पाबळे आदींनी आपल्या भूमिका मोठ्या ताकदीने सादर केल्या आहेत. समाजातील वाढत्या विषमतेमुळे सर्वसामान्य माणसाला व्यवस्थेच्या टाचेखाली तुडवले जाते. त्यांच काहीसं सांडलेल पण बरचसं न सांडलेल रक्त या सिनेमातून दिसतं.चिरडल्या जाणाऱ्या माणसांचे रक्त न्यायव्यवस्था, माध्यम , समाज यांना न दिसल्याने दिसत नाही.त्यामुळे हिंसाचार अक्षरशः बोकाळतो.चित्रपटात व्यवस्थेत केला जाणारा हिंसाचार सत्य घटनेचा आधार घेऊन चित्रित करण्यात आला आहे.विविधता असलेल्या आपल्या देशात प्रत्येक व्यक्तीला आपापल्या वेगळेपणासकट सुरक्षित आणि सन्मानानं जगण्याचा संवैधानिक अधिकार आहे . पण जगातली सगळ्यात मोठी लोकशाही' अशी ओळख असलेल्या आपल्या देशात हे का घडतं याचा विचार करायला हा सिनेमा भाग पाडतो.यावेळी अन्वर पटेल, राजन मुठाणे, पांडूरंग पिसे, बसवराज कोटगी, बजरंग लोणारी, नुरुद्दिन काझी,महेंद्र जाधव, रामदास कोळी, सचिन पाटोळे, इंद्रायणी पाटील,राजू नदाफ, शहाजी धस्ते,गजानन पाटील, विनायक होगाडे ,प्रा.डॉ.खांडेकर, महमद मुल्ला, दामोदर कोळी, शहनाज मोमीन , रोहीत दळवी आदींसह अनेकांची उपस्थिती होती.