प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : घे पंगा खेळाचा, कर दंगा विजयाचा ! नमो चषक 2024 व सांस्कृतिक क्रीडा स्पर्धा , अंतर्गत इचलकरंजीत आज कुस्ती स्पर्धां मधील विजेत्यांना महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे, व प्रदेशाउपध्यक्ष सुरेशराव हाळवणकर यांच्या हस्ते रोख पारितोषिकसह नमो चषक व नमो मानाची गदा देण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा इचलकरंजी आयोजित नमो चषक विविध क्रीडा सांस्कृतिक 2024 स्पर्धेचे आयोजन प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व शहराध्यक्ष पै अमृत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा क्षेत्रात युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड यांनी
स्पर्धेचे आयोजन केले आहे या अंतर्गत आज कोल्हापूर जिल्हा शहर राष्ट्रीय तालीम संघ मान्यतेने जयहिंद मंडळ मैदानावर कुस्ताची स्पर्धा घेण्यात आली,या स्पर्धेमध्ये इचलकरंजीसह शिरोळ कागल,तालुक्यातील पैलवान स्पर्धकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. इचलकरंजी भूमीत युवा मोर्चा नमो चषक कुस्ती स्पर्धा रंगली.यावेळी बोलताना मंत्री महोदय खाडे यांनी स्पर्धा कुस्ती शौकिनांच्या साठी भाजप ने मेजवानीच दिली स्पर्धेतआंतरराष्ट्रीय,राज्य
पातळीवरील पदक विजेते मल्ल सहभागी झाल्यामुळे स्पर्धा चांगलीच रंगली.आहे तर इचलकरंजीला कुस्तीची मोठी परंपरा लाभली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवणारे आणि ऑलम्पिक गाजवणारे दिग्गज इथल्याच लालमातीत घडले. राज्यस्तरावर येथील अव्वल दर्जाच्या मल्लानी दबदबा निर्माण केला आहे इचलकरंजीसह परीसरात कुस्ती क्षेत्राला दैदिप्यमान इतिहास आहे मोदीजींच्या संकल्पनेतून भव्य नमो कुस्ती स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खेळाच्या रूपाने स्पर्धा भरवत खेळ हे जीवनासाठी उत्तम असून, कुस्ती हा मातीतला खेळ आहे.शहरी ग्रामीण भागात कुस्ती या खेळाला अत्यंत महत्त्वाचे स्थान असून नमो चषकाच्या निमित्ताने भागातील लोकांना एक उत्साहाचे वातावरण निर्माण होत असते. आणि म्हणून अशा स्पर्धा भरवल्या जातात असे सांगितले. या स्पर्धे प्रसंगी शहराध्यक्ष पै अमृत भोसले, युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड, महिला आघाडी अध्यक्षा सौ अश्विनी कुबडगे, पुनम जाधव, ज्योती लाटणे नागुबाई लोंढे, माधवी मुंढे शबाना शहा,
संगिता साळुंखे, मा. जिल्हा अध्यक्ष हिंदूराव शेळके, वस्त्रोद्योग महासंघ अध्यक्ष अशोक स्वामी, संगांयो समिती अध्यक्ष अनिल डाळ्या,मा. सरचिटणीस राजेश रजपुते, बालकृष्ण तोतला, उपनगराध्यक्ष,सुनील महाजन, तानाजी पोवार, उदय बुगड, मामा जाधव, मिश्रीलाल जाजू , युवराज माळी, मनोज साळुंखे, राजेश रजपुते बाळकृष्ण तोतला,उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे, महेश पाटील प्रदिप मळगे, मा. जहांगीर पटेकरी, प्रसाद खोबरे, मनोज साळुंखे, दिपक राशिनकर, युवराज माळी, दिलीप मुथा, अजितमामा जाधव, मारुती पाथरवट, अरुण कुंभार, अर्जुन सुतार, ऋषभ जैन युवा मोर्चाचे नितिन पडियार कार्यक्रमाचे संयोजक आशिष खंडेलवाल, हेमंत वरुटे, श्रेयस गट्टानी, राहुल गागडे, अभिषेक वाळवेकर, मनोज तराळ, विपुल खोत, प्रथमेश लाखे, उमेश गोरे, जिवक कांबळे, सुरज आडेकर, आदित्य पाटील,यश वायचळ, प्रकाश खारगे, तसेच युवा मोर्चा कार्याकर्ते, शहर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.