प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शहरातील मिळकत धारकांच्या थकीत घर पाळा वसुलीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. याकरिता पाच वसुली पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर पथकाकडून वॉर्डनिहाय थकबाकीदारांच्या घरी जाऊन थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु वसुलीसाठी थकबाकी धारकांच्या घरी वारंवार महानगरपालिकेची पथके जाऊन सुध्दा काही मिळकत धारक आपला घरफाळा भरत नसल्याने अशा मिळकत धारकांच्या मिळकती सिल करणेचे आदेश आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी दिले होते.
या आदेशाचे अनुषंगाने महानगरपालिकेच्या वसुली पथकांच्या वतीने सोबतचे यादिप्रमाणे १४ मिळकत धारकांच्या मिळकती सिल करणेत आलेल्या आहेत. तसेच १३० नळ कनेक्शन कट करणेत आलेली आहेत. १ महिन्यानंतर सदर सिल करणेत आलेल्या मिळकतींचा महानगर पालिकेच्या वतीने लिलाव करणेत येणार आहे.
महानगरपालिकेच्या वतीने घरफाळा वसूली यापुढे सुद्धा सुरू राहणार असल्याने थकबाकी असलेल्या मिळकत धारकांनी आपला घरफाळा व पाणी पट्टी भरून जप्ती आणि लिलाव या सारखे कटु प्रसंग टाळावेत असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांचेकडून करणेत येत आहे.