प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे
तारदाळ (ता. हातकणंगले) येथील उत्तम बापू शिंदे (वय ३४) हा युवक गेली दोन दिवस बेपता होता. शुक्रवारी दुपारी अर्जुनवाड येथील नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून अपघात की घातपात असा सशंय व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, उत्तम शिंदे हा तारदाळ येथील केबल नेटवर्क मध्ये कामास होता. बुधवारी सकाळी तो घराबाहेर पडला होता. तो घरी परत न आल्यामुळे उत्तम बेपत्ता असल्याची वर्दी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दिली होती. तसेच उत्तम व त्याचे दोन मित्र बुधवारी अंकली येथे गेले असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.