मतदार : माझी जबाबदारी ' विषयावर पत्रलेखन स्पर्धा

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी :  आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी प्रबोधिनी आणि वृत्तपत्र पत्रलेखक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ' मी मतदार : माझी जबाबदारी ' या विषयावर पत्रलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदाराला राजा संबोधले जाते.या राजाची नेमकी जबाबदारी काय ? हे सांगणारे २०० ते २५० शब्दांचे पत्र या स्पर्धेसाठी अपेक्षित आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून पत्रलेखकांनी आपले पत्र १५  एप्रिल २०२४   पूर्वी 'समाजवादी प्रबोधिनी, ५३६/१८ ,इंडस्ट्रियल इस्टेट, इचलकरंजी ' या पत्त्यावर पाठवावे .या स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना समारंभपूर्वक रोख रक्कम व सन्मानपत्राने गौरवले जाणार आहे. 

या स्पर्धेत जास्तीत जास्त पत्रलेखकानी सहभाग घ्यावा असे आवाहन दोन्ही संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.यावेळी प्रसाद कुलकर्णी यांना ' स्वातंत्र्य सेनानी दौलतराव निकम जीवनगौरव पुरस्कार ' मिळाल्याबद्दल त्यांचा पत्नी सौदामिनी यांच्यासह  वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष पांडुरंग पिसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मनोहर जोशी, महेंद्र जाधव, संजय भस्मे,दीपक पंडित , बाळासाहेब नरशेट्टी आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post