प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी शहरास पाणीपुरवठा करणेत येत असलेल्या कृष्णा पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन बदलने तसेच सी.ई.टि.पी. प्लॅंटचे काम महानगरपालिकेकडून सुरू आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू असल्याने आणि जुन्या पाईप लाईनला वारंवार गळती लागत असल्याने पाणी टंचाई निर्माण होऊन शहरास अपुरा पाणीपुरवठा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
शहराच्या पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली कृष्णा नदीतुन पाणी पुरवठा होणार असलेली नवीन पाईप लाईन बदलने हि बाब विचारात घेऊन आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी आज बुधवार दि.२० मार्च रोजी बौद्ध विहार, टाकवडे रोड येथे पाईप लाईन बदलने या आणि सी.ई.टी.पी. प्लॅंट बांधणे या दोन्ही कामांची भेट देऊन पाहणी करून कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे आणि संबंधित मक्तेदार यांना सदर काम तातडीने आणि गुणवत्तापूर्वक करणेच्या सुचना दिल्या.
याप्रसंगी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांचे सह कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.