आंबेडकरनगर व गणेशनगर परिसरात घाणीचे साम्राज्य.

आरोग्य खात्याचे दुर्लक्ष .... 

नागरिकांचे आरोग्य धोक्यात


प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी : आंबेडकरनगर व गणेशनगर मधील मध्यभागी असणाऱ्या कारंडे यांच्या मालकीच्या मोकळ्या जागेमध्ये गणेशनगर मधील काही भागातील गटारीचे सांडपाणी गटार नसल्यामुळे मोकळ्या जागेत सोडल्यामुळे ते मोकळ्या जागेत इतरत्र पसरत आहे.त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात दलदल निर्माण होऊन घाणीचे साम्राज्य  दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळे याठिकाणी दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाडून परिसरातील नागरिकांचे आरोग्यावर परिणाम होत आहे.


  याबाबत महापालिका प्रशासनाला अनेकवेळा निवेदन देऊनही व संबंधित अधिकाऱ्यांना तोंडी सांगूनही महापालिकेच्या  आरोग्य विभागा मार्फत आरोग्य अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व मक्तेदाराने अद्यापही याप्रश्नाची दाखल घेतली  नसल्याने हा प्रश्न दिवसेंदिवस जटील बनत चालला आहे.

  महापालिका प्रशासन परिसरातील नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे परिसरामध्ये रहात असलेल्या नागरिकांना वाटू लागले आहे.परिणामी डासांच्या उत्पत्तीमुळे व कुत्री आणि डुकरांच्या वास्तव्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडत चालले आहे.अनेकांना यामुळे डेंग्यूची लागणही झाली होती.त्याचाबरोबर साथीचे आजारही  दिवसेंदिवस वाढत आहेत.

                त्यामुळे आज या परिसरामध्ये रहात असलेले सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगावे व परिसरातील  नागरिकांनी आरोग्य अधिकारी डॉ संगेवार, स्वच्छता निरीक्षक महादेव माळी व मक्तेदार  राहुल गायकवाड यांना कारंडे यांच्या जागेतील या ज्वलंत  प्रश्नांविषयी बोलावून माहिती दिली असता जागेचे मालक कारंडे यांना बोलावून घेऊन सदर प्रश्न हा उद्याच्याउद्या निकालात काढण्याचे अस्वासन दिले.*

               *आंबेडकरनगर व गणेशनगर मध्ये अशा अनेक  मोकळ्या जागा महापालिकेच्या मालकीच्या व  खाजगी मालकीच्या आहेत त्याठिकाणीही गटारीचे सांडपाणी हे पसरत असल्यामुळे घाणीचे साम्राज्य वाढुन डासांची उत्पत्ती वाढत आहे  परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे त्यामुळे  महापालिकेचे आयुक्त व आरोग्य अधिकारी यांनी संबधीत जागा मालकांना याबाबत लेखी सूचना देऊन सदर प्रश्न लवकरात लवकर निकालात काढावा अन्यथा परिसरातील नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सांगितले.*

Post a Comment

Previous Post Next Post