प्रेस मीडिया लाईव्ह ;
इचलकरंजी ता.९ थोर स्वातंत्र्य सैनिक आणि गांधीवादी नेते दौलतराव निकम जन्मशताब्दी समितीच्या वतीने 'स्वातंत्र्य सेनानी दौलतरावजी निकम जीवन गौरव पुरस्कार ' समारंभपूर्वक समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांना सपत्नीक कालवश दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय ,व्हन्नुर ( ता. कागल जि. कोल्हापूर ) येथे प्रदान करण्यात आला.
यावेळी पुणे शिक्षक मतदार संघाचे आमदार जयंत आसगावकर , कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती सुनंदा निकम, संस्थेचे सेक्रेटरी यशवंतराव निकम ,मुख्याध्यापक आणि समितीचे सचिव व्ही.जी.पोवार, दलित मित्र एस. आर,बाईत, दलित मित्र प्रा. डी.डी.चौगुले, बी.एस. खामकर, बबन बारदेस्कर जन्मशताब्दी समितीचे सर्व सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व कागल तालुक्यातील अनेक मान्यवर नागरिक बंधू-भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना प्रसाद कुलकर्णी म्हणाले स्वातंत्र्य सेनानी दौलतरावजी निकम यांच्या नावाच्या जीवन गौरव पुरस्काराने माझी उमेद व जबाबदारी दोन्हीही वाढली आहे याची नम्र जाणीव मला आहे. तसेच हा पुरस्कार मला मिळण्यामध्ये समाजवादी प्रबोधिनीच्या कार्यामध्ये मला सहकार्य करणाऱ्या सर्वांचा महत्त्वाचा वाटा आहे यात शंका नाही. या पुरस्काराबद्दल मी कृतज्ञ आ