महिलांच्या न्याय हक्कासाठी आपण लढले पाहिजे .मा.अनुराधा भोसले यांचे प्रतिपादन



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता.१३,आज पालक आणि विद्यार्थिनी यांच्या मधील संवाद हरवत चालला आहे तो पुन्हा सुरू होणे महत्त्वाचे आहे, याशिवाय आजही स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान दिले जाते, महिला दिन फक्त साजरा करून चालणार नाही तर महिलांच्या न्याय हक्कासाठी आपण लढले पाहिजे असे मत अवनी संस्थेच्या प्रमुख व ज्येष्ठ सामजिक कार्यकर्त्या अनुराधा भोसले यांनी व्यक्त केले. त्या श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात महिला सक्षमीकरण व तक्रार निवारण समिती आणि समाजवादी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाच्या कार्यक्रमात ' सन्मान नारीशक्तीचा 'या विषयावर प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. त्रिशला कदम होत्या.यावेळी मंचावर प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.प्रास्ताविक कॅप्टन प्रमिला सुर्वे यांनी केले.पाहुण्यांची ओळख डॉ संपदा टिपकुर्ले यांनी करून दिली.

 अनुराधा भोसले यांनी अतिशय प्रभावी मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापकांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.अर्थशास्त्र विभागाच्या वतीने तयार करणाऱ्या आलेल्या 'स्वतंत्र मी' या लघुपटाचे प्रकाशन प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.त्यांनी मनोगतही व्यक्त केले.महाविद्यालयामधील आदर्श विद्यार्थिनी कन्या सुकन्या म्हणून कुमारी सुप्रिया सवाईराम हिची निवड करण्यात आली. तर महाविद्यालयातील शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 प्राचार्य प्रो.डॉ.त्रिशला कदम यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी,त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी असे विविध कार्यक्रम नेहमीच राबवत असते, विद्यार्थिनींनी अशा कार्यक्रमातून प्रेरणा आणि प्रोत्साहन घ्यावे.सूत्रसंचालन आणि आभार डॉ.प्रतिभा पैलवान यांनी मानले.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते,पालक प्रशासकीय सेवक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post