प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी महानगरपालिका संचलित सरोजिनी नायडू विद्या मंदिर शाळा क्रमांक - ४३, शहापूर या शाळेत महाराष्ट्र शासनाकडून शाळेस मिळालेल्या इंटरॲक्टीव्ह टि. व्ही. पॅनेलचे (डिजिटल क्लासरुम) उद्घाटन आणि अभ्यास (स्टडी) डायरीचे प्रकाशन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते आणि इचलकरंजी रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनिल सातपुते आणि सेक्रेटरी पंकज कोठारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
याप्रसंगी आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधुन उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करून अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक सुलभपणे आणि आनंदी होईल याबाबतचे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर शाळेत राबविणेत येणा-या विविध उपक्रमांचे कौतुक केले. सरोजिनी नायडू शाळेने आय.एस.ओ. मानांकन मिळविले आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या इतर शाळांना सुद्धा आय. एस. ओ. मानांकन प्राप्त व्हावे यासाठी सरोजिनी नायडू शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी इतर शाळांना मार्गदर्शन करावे अशी महत्त्वपूर्ण सूचना केली.
रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांनी शाळेस दोन हजार लिटर पाण्याची टाकी देण्याची घोषणा यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनिल सातपुते यांनी केली.
सदर कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक मुख्याध्यापक गणेश यांनी केले. तर सूत्रसंचलन अध्यापिका वैशाली राऊत यांनी केले. आभार प्रदर्शन दिपाली कुंभार यांनी केले.
यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे शहराध्यक्ष किरण दिवटे, शिक्षक समितीचे शहराध्यक्ष संजय देमाण्णा यांचेसह शिक्षक- शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.