हातकणंगले लोकसभेची जागा भाजपला द्या : चित्रा वाघ

 इचलकरंजी महिला आघाडी कडुन नारी शक्ती वंदन मेळाव्याचे आयोजन


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी. : हातकणंगले लोकसभेची निवडणूक कमळ चिन्हावर लढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी केलेली मागणी ही वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिले.

शहर भाजप कार्यालयात महिलांचा नारी शक्ती वंदन मेळावा व महिला आघाडी शहर कार्यकारिणी निवड पत्र वाटप कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडिक, जिल्हाध्यक्षा पुष्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

सौ वाघ म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला कोणी रोखू शकणार नाही. जनताच भाजपसाठी मतदान करण्यास इच्छुक आहे. देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी पंतप्रधान मोदींची गरज आहे. यापूर्वी झालेल्या अनेक राज्यांच्या निवडणुकीत महिलांनी सर्वाधिक मतदान केले आहे. पंतप्रधान होणे ही मोदींची गरज नसून आपली गरज आहे. महिलांनी दररोज २० घरांमध्ये जाऊन मोदी, कमळ व भाजप पोहोचविण्याचा निर्धार केला पाहिजे. महिलांसाठी अनेक योजना राबविल्या. त्या योजना घराघरांत पोहोचविल्या पाहिजेत.

जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक- निंबाळकर यांनी, कामे भाजपा  करतो. समस्या आम्ही सोडवितो. त्याचा लाभ भाजपला झाला पाहिजे. येणारा खासदार कमळ चिन्हावर असावा, अशी भावना सर्व कार्यकर्तेची आहे 

  सौ. महाडिक म्हणाल्या. महिलांना मोदींनीप्रवाहात आणले आहे. महायुतीच खासदार करण्यासाठी राज्यभर रॅली काढली जात आहे. जिल्हाध्यक्षा पाटील यांचेही भाषण झाले.

प्रथम शिवतीर्थ येथे सौ वाघ यांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महिलांच्या रॅलीला सुरुवात झाली रॅलीमध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती अरे रॅली मध्ये मोदींच्या योजनांच्या हातात फलक घेऊन घोषणा देत उत्साहात शहर कार्यालयात पोचली. शहर अध्यक्षा अश्विनी कुबडगे यांनी प्रास्ताविक केले. जयश्री गाठ. नीता माने, रमा फाटक, अलका शिंदे तेजस्विनी पाटील, शहराध्यक्ष पै अमृत भोसले, जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले, युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड, उपाध्यक्ष अनिस म्हालदार ,बाळकृष्ण तोतला दिपक पाटील हेमंत वरूटे महेश पाटील, योगिता दाभोळे,सुप्रिया मजले माधवी मुंडे, संगीता घोरपडे अरविंद चौगुले आदी मान्यवर पदाधिकारी भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post