प्रेस मीडिया लाईव्ह:
हेरले प्रतिनिधी / संदीप कोले
गेल्या एक ते दीड महिना अगोदर हेरले ग्रामपंचायत उपसरपंच बक्तीयार जमादार यांनी राजीनामा दिला. तेव्हापासून गावाला उपसरपंच नव्हता.आज उपसरपंचाची निवड झाली.
हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील उपसरपंच निवडीसाठी एकूण चार उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यात आले होते.त्यापैकी अर्जुन पाटील,अमित पाटील, हिरालाल कुरणे, व निलोफर खतीब.यांचे अर्ज आले होते. त्यावेळी हिरालाल कुरणे व अमित पाटील यांनी अर्ज माघारी घेतली. त्यावेळी सरपंचाने मतदानाची प्रक्रिया करून अर्जुन पाटील यांना 9 मते व निलोफर खतीब यांना 9 मते दोघांना समान मते पडल्यामुळे लोकनियुक्त राहुल शेटे सरपंच यांनी आपला मतदानाचा हक्क बजावून निलोफर खतीब यांना उपसरपंच पदी निवड करण्यात आली.
त्यावेळी हेरले ग्रामपंचायतचे सरपंच राहुल शेटे ग्रामसेवक बी.एस कांबळे ग्रामपंचायत सदस्य हिरालाल कुरणे, बानूबी खतीब, रेशमा खाबड़े,विजय भोसले, अमीन बारगीर, शुभांगी चौगुले, राकेश जाधव,अमित पाटील, अर्जुन पाटील, उर्मिला कुरणे, सविता पाटील, मनोज पाटील, व इतर सदस्य,ग्रामपंचायत कर्मचारी, व नागरिक उपस्थित होते. त्यावेळी निलोफर खतीब या वंचित बहुजन आघाडीच्या सदस्य असल्यामुळे हेरले गावाला प्रथमच वंचित बहुजन आघाडीचा उपसरपंच लाभल्यामुळे निलोफर खतीब यांना हेरले गावातील नागरिक व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व स्वाभिमानी गाव विकास आघाडी यांनी शुभेच्छाचा वर्षाव करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.