स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पुणे ते बंगलोर मार्गावरील गायकवाड पेट्रोलपंपा जवळ असलेल्या हॉटेल जंग्भेश्वर हायवेच्या पाठीमागे असलेल्या चार खोल्या पैकी एका खोलीत छापा टाकून मनिष मोहनराम (वय 23.रा.पेठ वडगाव ,को.) मोहन मोकलू चव्हाण (वय 45.रा.वाठार ,को.).आणि अमीर सय्यद जमादार (वय 40.रा.पुलाची शिरोली) या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडील 5 लाख 21 हजार रुपये किंमतीचा अमंली पदार्थ जप्त करून त्यांच्या विरोधात पेठ वडगाव पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की,स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला पेठ वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पुणे बंगलोर मार्गावर हॉटेल जंग्भेश्वर हायवेच्या पाठी मागे असलेल्या चार खोल्या पैकी एका खोलीत अफु बोंडाची पावडर करून साठा करत असल्याची आणि गांजाचीही विक्री होत असल्याचे समजले असता त्या अनुशंगाने या पथकाने खात्री करून 19/03/2024 रोजी रात्रीच्या सुमारास छापा टाकून मनिष मोहनराम ,मोहन चव्हाण आणि अमीर जमादार या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडील 40 किलो वजनाचा अफु व 1 कि.1. 95 gm.वजनाची बारीक केलेली पावडर आणि 1 कि.गांजा असा एकुण 5 लाख 21 हजार कि मंती चा अंमली पदार्थ मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेद्र पंडीत ,अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई, निकेश खाटमोडे -पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर वाघ यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.