प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-परिक्षेचा निकाल देण्यासाठी 500/ रुपयांची लाच मागणारा क.लिपीक सोपान धोंडीराम माने (वय.54.रा. मसुटे कॉलनी,सरनोबतवाडी). याला 500/ रु.लाच घेताना लाचलुचपतच्या पथकाने रंगेहात पकडून त्याच्यावर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.
अधिक माहिती अशी की तक्रारदार शिवाजी विद्यापीठाच्या संलग्न असलेल्या भारती विद्यापीठ या संस्थेच्या अंतर्गत असलेल्या न्यु लॉ कॉलेज,चित्रनगरी कोल्हापूर.येथे लॉ कॉलेजच्या तिसरयां वर्षात शिकत असून त्याने परिक्षा दिली होती .पण त्यानी दिलेल्या परिक्षेचा अंतिम निकाल प्रशासकीय कारणाने लागलेला नसल्याने त्यासाठी तक्रार यांनी क.लिपीक सोपान माने यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांना निकाल लागण्या साठी 500/ फि द्यावे लागेल असे म्हणून 500/ लाचेची मागणी करत तक्रादाराकडुन 500/रु.घेताना लाचलुचपतच्या पथकाने रंगेहात पकडून आरोपीच्या विरोधात करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक श्री.सरदार नाळे,पो.उपनिरीक्षक बंबरगेकर यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.तसेच कोल्हापुर जिल्हयातील सर्व नागरिकांनी त्यांच्या कोणत्याही शासकीय कार्यालयातील अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.असे आवाहन लाचलुचपत विभागाने केले आहे.