सहा जणांना अटक करून आज एकास अटक करण्यात आली आहे
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-लक्ष्मीपुरी येथील बनावट सोने देऊन 57 लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी 5 महिलासह 23 जणांच्यावर लक्ष्मीपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सहा जणांना अटक केली होती.
यातील पोलिसांनी सतीश बाळकृष्ण पोतदार (रा.संभाजीनगर ,कोल्हापूर) याला आज अटक केली असूनअटक केलेल्यांची संख्या सात झाली आहे.यातील काल सहा जणांना अटक केलेल्यांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या संशयीतापैकी ब्यंकेचा मुल्यांकनकार सागर कलघटगी ,ओंकार शिंदे,तुषार जाधव,सुजल शिंदे,गोपीनाथ शेंडगे आणि श्रावण हळदणकर यांना काल अटक केली होती.उर्वरितांचा पोलिस शोध घेत आहेत.